हमाली
हमाली  
मुख्य बातम्या

हमाली वसुलीतून ‘सीसीआय’च्या केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

टीम अॅग्रोवन

जळगाव : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून मागील हंगामात सर्रास बैलगाडीतून कापूस उतराईची मजुरी उकळण्यात आली. जवळपास सव्वा लाख क्विंटल कापूस सीसीआयच्या केंद्रात खरेदी केला. यात लाखो रुपयांची लूट झाली असून, हमालांच्या नावे वरकमाईचा प्रकार झाल्याची कुजबूज शेतकरी व सहकार क्षेत्रातील मंडळीमध्ये आहे.  जिल्ह्यात मागील हंगामात पणन महासंघाच्या केंद्रापेक्षा खुल्या बाजारात दर अधिक होते, त्यामुळे कापूस खरेदीला प्रतिसाद लाभला नाही. पण सीसीआयने खुल्या बाजारात कापूस खरेदी जानेवारीत सुरू केली. जळगाव, कुऱ्हे पानचे (ता. भुसावळ) आणि एरंडोल येथे ही खरेदी सुरू होती. यंदा मात्र सीसीआयने अजून खुल्या बाजारात कापूस खरेदी सुरू केलेली नसल्याने सीसीआयच्या केंद्रांवर कुठलीही आवक झालेली नाही व शेतकऱ्यांकडून बैलगाडीतून कापूस उतरविण्यासंबंधीचे पैसे उकळण्याचे प्रकार सुरू नसल्याचे सांगण्यात आले.  बैलगाडीतून शासकीय खरेदी केंद्रात जो कापूस येतो तो उतरविण्यासाठी किंवा बैलगाडी रिकामी करण्यासाठी संबंधित केंद्राला मजुरी शासकीय यंत्रणेकडून हंगामाच्या अखेरिस मिळते. परंतु सीसीआयच्या केंद्रांवर मागील हंगामात सर्रास बैलगाडीतून कापूस उतरविण्यासाठी क्विंटलमागे १० रुपये मजुरी उकळण्यात आल्याची तक्रार असून, खुद्द पणन संचालक संजय पवार यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. बैलगाडीतून आलेल्या कापसासंबंधी जशी हमाली आकारली तशीच हमाली ट्रॅक्‍टरमधून आलेल्या कापसालाही आकारली. बैलगाडीत साडेपाच क्विंटल तर ट्रॅक्‍टरमध्ये कमाल ३० क्विंटल कापूस येत होता. ट्रॅक्‍टरबाबत शेतीचा कुठलाही नियम न लावता त्यास व्यावसायिक नियम लावून कापूस उतरविण्याची मजुरी संबंधित ट्रॅक्‍टरमालक शेतकऱ्याकडून सर्रास आकारली गेली, अशी माहिती मिळाली.  सीसीआयने मागील हंगामात उशिराने खुल्या बाजारात कापूस खरेदी सुरू केली होती. सर्वच केंद्रांवर प्रतिसाद मिळणार नाही म्हणून तीनच केंद्र सुरू केले होते. त्यात अखेरपर्यंत सव्वा क्विंटल कापूस खरेदी झाला. एवढ्या कापसासंबंधीची उतरविण्याची हमाली शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्याकडूनही आणि शासनाकडूनही बैलगाडी व वाहनातून कापूस उतरविण्याची मजुरी आकारली. पण हा प्रकार केवळ हमालांनी केला, शेतकरीच हमालांना खुशाली म्हणून पैसे देऊन गेले, अशी बतावणी आता शासकीय यंत्रणांमधील मंडळी करीत आहे.  प्रतिक्रिया शासन शासकीय कापूस खरेदी केंद्रात बैलगाडीतूून आलेला कापूस उतरविण्यासाठी निर्धारित निधी मजुरीपोटी देते. हंगामाच्या अखेरिस असा निधी सबंधित खरेदीदार यंत्रणेला दिला जातो. परंतु हमालांच्या नावाखाली सीसीआयच्या केंद्रांवर कापूस उतरविण्याच्या मजुरीचे पैसे उपटले गेल्याच्या तक्रारी आहेत. यासंबंधी यंत्रणांची चौकशी झाली पाहीजे. बाजार समितीची ती जबाबदारी आहे.  - संजय पवार, पणन संचालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT