सोयाबीन
सोयाबीन  
मुख्य बातम्या

सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा आखडता हात

टीम अॅग्रोवन

पुणे : देशाच्या तेलबिया आणि कडधान्य धोरणात आठ दिवसांत फेरबदल होण्याचे संकेत मिळताच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी हात आखडता घेण्यास प्रारंभ केला अाहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वाढल्याने बाजारदरात सुधारणा होण्याचे संकेतही व्यापाऱ्यांसह तेलबिया उद्योगाने दिल्याने सोयाबीनची आवक मंदावण्याचा अंदाज आहे.  केंद्र सरकारच्या मंत्रिगटाची दुसरी बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा शेतमाल विशेषत: तेलबिया आणि कडधान्यांच्या आयात-निर्यातीसंदर्भातील सादरीकरण करून या प्रश्‍नाचे महत्त्व विशद केले.  अन्नमंत्री रामविलास पासवान यांनीसुद्धा हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असेल, तर आयात-निर्यात धोरणात सुधारणांकरिता स्वतंत्र यंत्रणेची मागणी नोंदविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सुधारणांना हिरवा कंदील दाखविल्यामुळे या बैठकीत पंतप्रधानांचे सचिव आणि कॅबिनेट सचिव, वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. सोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. मात्र, सध्या १४०० ते २५०० दरम्यान दर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच पेरणीनंतरचा पावसाचा खंड आणि काढणीच्या वेळेला आलेला पाऊस यामुळे उत्पादकता कमी होऊन मोठे नुकसानही झाले. केंद्र सरकारने महाराष्ट्रातून १ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचे जाहीरही केले; परंतु राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक असलेल्या सोयाबीनचे यंदा ३८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता अाहे. अशातच एक लाख टनाच्या खरेदीच्या घोषणेने बाजार दरावर तसूभरही परिणाम झाला नाही. किंबहुना बाजारातही दरातील घसरणही राेखली गेली नाही.  प्रतिक्रिया केंद्रातील निर्णयाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन दरात सुधारणा होणार असल्यास आम्ही काही काळ वाट पाहण्यास तयार आहोत. - बाजीराव कदम, रवंदे, ता. कोपरगाव, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT