Farmer Production Company Certificate course started 
मुख्य बातम्या

शेतकरी उत्पादन कंपनी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्यासंबंधीच्या प्रमाणपत्र ऑनलाइन अभ्यासक्रमाला सुरवात होत आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्यासंबंधीच्या प्रमाणपत्र ऑनलाइन अभ्यासक्रमाला सुरवात होत आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन प्रवेश घेण्याची संधी १५ फेब्रुवारीपर्यंत दिली आहे.

या अभ्यासक्रमाचे प्रारूप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ''सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन ॲग्रीकल्चर अँड ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज'' (सीटा) चे कार्यकारी संचालक फिरोज मसानी यांनी तयार केला आहे. विद्यापीठाने त्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकताच कार्यक्रम झाला. त्यामध्ये अभ्यासक्रमाच्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण मसानी यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्याकडे केले.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सल्लागार, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या अनुभवाचा उपयोग अभ्यासक्रमाच्या रचनेत झाला आहे. 

मसानी म्हणाले, ‘‘‘सीटा‘तर्फे शिक्षण संवादाच्या माध्यमातून अभ्यासक्रम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचेल. ’’  कायदे, तरतुदींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्यावर उपाय म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. 

पदविकेपर्यंत होणार विस्तार  

शेतकरी उत्पादक कंपनीसंबंधीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ई-बुक तयार करण्यात आली आहेत. केंद्रांवर प्रात्यक्षिकांची व्यवस्था केली जाईल. या अभ्यासक्रमाचा विस्तार पुढे पदविकेपर्यंत केला जाईल. यात सहभागी होण्यासाठी मुक्त विद्यापीठातर्फे आत्मा आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT