farmers information center
farmers information center  
मुख्य बातम्या

संत्रा पट्ट्यात रेल्वेचे शेतकरी माहिती केंद्र

टीम अॅग्रोवन

नागपूर: संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेचा स्वस्त आणि वेगवान पर्याय उपलब्ध करून देण्याच्या नितीन गडकरी यांच्या सूचनेची दाखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्या अंतर्गत  संत्रापट्ट्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत.  शेतमाल वाहतुकीसाठी किसान रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु रेल्वेने शेतमाल पाठवण्यासाठी किती दर आकारले जातात त्याकरिता बुकिंग कसे करावे अशी प्राथमिक माहिती देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना नाही.  त्यामुळे रेल्वे प्रशासनाने शेतमाल वाहतुकी करता रोडमॅप तयार करावा.  त्यासोबतच शेतमाल वाहतूक नोंदणी करता येईल व अंतरनिहाय दराची माहिती उपलब्ध असेल असे संकेतस्थळ विकसित करावे असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्याची दखल घेत पहिल्या टप्प्यात संत्रा उत्पादकांच्या सुविधे करता रेल्वे प्रशासनाच्या वतीने संत्रापट्ट्यातील बहुतांश रेल्वेस्थानकांवर माहिती केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.  चार ठिकाणी असलेल्या या केंद्रावर प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कर्मचारी शेतकऱ्यांना संत्रा व इतर शेतमाल वाहतुकी संदर्भाने उद्भवणाऱ्या शंकांचे समाधान करण्यास मदत करणार आहे. दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात हे माहिती केंद्र सुरू राहील.  यामाध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या वतीने त्यांच्या स्तरावर संत्रा वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे.  याला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आयात शुल्क कमी करा नागपुरी संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये होते. परंतु बांगलादेश सरकारने त्यांच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे.  चाळीस रुपये प्रति किलो याप्रमाणे आयात शुल्काची आकारणी होते. संत्रा दरापेक्षा आयात शुल्क अधिक असल्याने ते कमी करावे अशी मागणी आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे या संदर्भाने अपेडा ने पाठपुरावा करावा, अशी या भागातील संत्रा उत्पादकांची अपेक्षा आहे.

संत्र्याची पहिली खेप छत्तीसगडला दरम्यान अजय जोरांडे  नामक शेतकऱ्याने आंबिया बहारातील संत्र्यांचे पहिले पार्सल रेल्वेच्या माध्यमातून पाठविले आहे.  नागपूर वरून बुकिंग करून हे पार्सल छत्तीसगडमधील टाटानगरला पाठवण्यात आले.  ९.६९ क्विंटल वजनाच्या  या पार्सल करता ९४९ किलोमीटर  अंतरासाठी २४५७ रुपये आकारण्यात आले आहेत. 

या स्थानकावर आहेत माहिती केंद्रे

  • पांढूर्णा
  • वरुड
  • नरखेड
  • काटोल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

    Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

    Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

    Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

    Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

    SCROLL FOR NEXT