krushi vighag
krushi vighag  
मुख्य बातम्या

वादग्रस्त शेतकरी गटाचा अहवाल आयुक्तांना सादर

टीम अॅग्रोवन

पुणे: यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी गटाची नोंदणी करताना ‘आत्मा’ यंत्रणेकडे खोटी माहिती दिली जात असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर करण्यात आला आहे. ‘आत्मा’च्या अख्यत्यारित स्थापन होत असलेल्या गटांना अनुदान दिले जाते. त्यामुळे गट स्थापनेसाठी किंवा प्रकल्प सादर करताना जोडलेले दस्तावेज काळजीपूर्वक तपासले जातात की नाही, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना एक अहवाल पाठविला आहे. त्यात खोट्या माहितीच्या आधारावर गट स्थापन झाल्याचे निदर्शनास आणले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका गटाचे दस्तावेज तपासले असता गट नोंदणीसाठी खोटी माहिती देण्यात असे अहवालात म्हटले आहे. ‘‘संबंधित जिल्ह्यातील शेतकरी नसताना गट नोंदणी करून ‘आत्मा’ कार्यालयाची फसवणूक केली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू कारवाई केली जाणार आहे,’’ असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.  खोटी माहिती देणारे गट कृषी खात्यावर दबाव आणतात हे देखील या अहवालातून स्पष्ट होते. कारण या गटाच्या अध्यक्षाने थेट कृषी खात्याच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. त्यामुळे या घटनेची चित्रफीत देखील जिल्हा अधीक्षकांनी आयुक्तांकडे सादर केली आहे.

प्रतिक्रिया यवतमाळचे प्रकरण आमच्यापर्यंत अजून आलेले नाही. मात्र, शेतकरी गटांना नोंदणीसाठी तयार केलेली सध्याची नियमावली चांगली आहे. अर्थात, त्यातून गटामधील वाद किंवा हेतू कळत नाही. याकरिता गटाची पहिली बैठक घेताना कृषी खात्याचा जबाबदार अधिकारी उपस्थित राहिल्यास गटातील वातावरण लक्षात येऊ शकेल. - किसनराव मुळे, कृषी संचालक, ‘आत्मा’ विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT