False video of auction in Pune market committee?
False video of auction in Pune market committee? 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीत लिलावाचे खोटे व्हिडिओ?

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे बाजार समितीत केवळ आपल्याकडेच शेतमाल यावा यासाठी काही व्यापारी न झालेल्या लिलावाचे अर्थात खोट्या लिलावाचे व्हिडिओ काढून समाजमाध्यमांमध्ये त्याचा प्रसार करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असे फसवे व्हिडिओ आणि त्यातील दरांपासून शेतकऱ्यांनी सावध व्हावे आणि त्यास बळी पडू नये असे आवाहन इतर व्यापाऱ्यांनी केले आहे.

याबाबत बोलताना येथील छत्रपती शिवाजी अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले,‘‘अनेक अडते आपला व्यवसायवाढीसाठी लिलावाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल करून, स्वतःच्या अडतीवर शेतमाल आणण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करतात. भोळा भाबडा शेतकरी अशा प्रसिद्धीला बळी पडतो. मात्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचा दर्जा, त्याची प्रतवारी आणि चार ठिकाणांच्या बाजारपेठांमधील बाजारभावांची खातरजमा आणि विचार करून आपला शेतमाल विशिष्ट अडतींवर पाठवावा. अशा पद्धतींमध्ये चार वेळा चांगला दर मिळेल. मात्र फसवणुकीचा पण धोका असतो. सर्व जोखमींचा विचार करून, शहनिशा करून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणावा.’’

निर्यात करावयाच्या दर्जाचा निवडक, सॅम्पल किंवा प्रतिकात्मक मालाला जास्त भाव देऊन त्या बाबत प्रसिद्धी देणे आणि त्याचा गैरवापर करून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केली जाणार नाही याची संबंधित अडत्यांनी दक्षता घ्यावी. या कार्य पद्धतीतून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढतील आणि त्या पूर्ण न झाल्यास संबंधित अडत्याविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमाल आणि किमान भाव विचारात घेऊनच बाजार भाव निश्चित केले जातात. शेतकऱ्यांनी सर्वोच्च भाव विचारात न घेता बाजार भाव व त्या व्यापाऱ्यांशी असणारे रोजचे संबंध, विश्वास  विचारात घेऊनच निर्णय घ्यावा. - मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT