मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सुविधा बंधनकारक :  डॉ. दीपक म्हैसेकर
मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सुविधा बंधनकारक : डॉ. दीपक म्हैसेकर  
मुख्य बातम्या

मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी सुविधा बंधनकारक : डॉ. दीपक म्हैसेकर

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रनिहाय माहिती घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारासाठी आवश्‍यक असलेल्या रॅम्प, व्हिल चेअर आदी सुविधांची उपलब्धता केली असल्याची खात्री करावी, या सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे’’, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ पूर्व तयारीबाबतच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त म्हैसेकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त चव्हाण, पिंपळगावकर, शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अति. पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले आदी उपस्थित होते. 

सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे. प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले. डॉ. भोसले यांनी विधानसभा निवडणुकीचे कामकाज शांततामय वातावरणात पार पाडण्याची खात्री दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT