Emphasis on strengthening health facilities: Chief Minister Thackeray 
मुख्य बातम्या

आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर ः मुख्यमंत्री ठाकरे

कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

मुंबई : कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पेटीएम फाउंडेशनच्या वतीने राज्यात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दृरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत आज (ता. ४) मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

पेटीएम फाउंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील, असे कौतुकोद्‌गारही काढले. बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि पेटीएम-फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा, सोनिया धवन, राजेंद्र गुल्हर आदी उपस्थित होते. यावेळी पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या कोविड उपाययोजनांसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पुढाकाराचे कौतुक केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, की विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरू केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरू झाल्यानंतरही जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT