Emphasis on development of East India: Prime Minister Modi
Emphasis on development of East India: Prime Minister Modi 
मुख्य बातम्या

पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान मोदी

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता, तेव्हा भारतीय इतिहासात सुवर्णयुग नोंदविले गेले. केंद्र सरकार या भागाच्या विकासावर जास्तीत जास्त भर देत आहे. कोलकता या विकासाचे नेतृत्व करू शकते, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. स्वातंत्र्यसैनिक आणि ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओडिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते.

ते यावेळी म्हणाले, की कोलकत्याचा एक व्हायब्रंट शहर म्हणून उदय होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भविष्यावर नजर असलेले व्हायब्रंट कोलकता विकासामध्ये केवळ पश्चिम बंगालचे नव्हे तर संपूर्ण पूर्व भारताचे नेतृत्व करू शकते. विकसनशील पूर्व भारताचे शक्तीकेंद्र म्हणून कोलकत्याचा उदय होण्यासाठी सरकार मदत करेल.

ओडिशासह बिहार, बंगाल, आसाम व ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण पूर्व भारतात अविश्वसनीय नैसर्गिक, मानवी संसाधने आहेत. केंद्र सरकार पायाभूत सुविधा व उद्योगांच्या माध्यमातून या भागातील विकासाची दरी भरून काढण्यावर काम करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओडिशाचा गौरवशाली इतिहास आणि विविधता लोकांपर्यंत पोचली पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘उत्कल केशरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरेकृष्ण महताब यांच्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, की स्वातंत्र्य संग्रामात तुरुंगात जाणाऱ्या व नंतर आणीबाणीला विरोध करणाऱ्या दुर्मीळ राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

पूर्व भारतामुळे देश विकासाची नवी उंची गाठू शकेल. केंद्र सरकार हजारो किलोमीटरचे महामार्ग उभारत आहे. ओडिशात बंदरांना जोडणारे किनारी महामार्ग, शेकडो किलोमीटरचे लोहमार्ग विकसित करण्यात येत आहेत. तेल, वायू आणि पोलाद उद्योगातही गुंतवणूक आणली आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT