भेकुर्लीतील रस्त्यावर हत्ती 
मुख्य बातम्या

भेकुर्लीतील रस्त्यावर हत्ती

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील केर-भेकुर्ली रस्त्यावर टस्कर हत्तीने एका दुचाकीस्वाराला दर्शन दिले. त्यामुळे भयभीत दुचाकीस्वार स्वप्नील देसाई यांनी दुचाकी सोडून पळ काढला. भरदिवसा हत्ती वस्तीत घुसू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हत्ती हटावची मागणी जोर धरू लागली आहे. वन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तेथील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, सोनावल, पाळ्ये, घोटगेवाडी या गावांत हत्तीचा वावर आहे. टस्कर हत्तीचे वास्तव्य सध्या केरमध्ये आहे. आणखी दोन हत्ती बाजूच्या परिसरात वावरताना आढळून येत आहेत. त्यांनी गेल्या दोन महिन्यांत या परिसरातील अनेक गावांतील बागायतीचे नुकसान केले. सतत होणाऱ्या नुकसानीने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत.

 या घटनेपूर्वीही टस्कर हत्ती भेकुर्लीतील नागरिकांना दिसला होता. काही दिवसांपूर्वी हत्ती एसटी बसला आडवादेखील आला होता. ग्रामस्थांकडून सतत हत्ती हटाव मोहिमेची मागणी केली जात आहे. परंतु वनविभागाने अशी मोहीम राबविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हत्तीचा वावर असलेल्या गावातील लोकांना आता काय करावे, हे सुचेनासे झाले आहे. परिणामी, आता ग्रामस्थ वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याच्या मनःस्थितीत आहेत.

पालकमंत्र्यांना निवेदन

तिलारी खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन केर भेकुर्लीचे उपसरपंच महादेव देसाई यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. या वेळी केसरकर यांनी तिलारी धरणाच्या बुडित क्षेत्रात हत्तीसाठी अभयारण्य बनविण्यात येईल, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT