मुख्य बातम्या

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे गावांचा विद्युत पुरवठा सुरू

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अांदोलनामुळे वीज कंपनीला खंडित पुरवठा सुरळीत करावा लागला. दहा ते बारा गावांची वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली. कुठलीही सूचना न देता वीज कंपनीने देऊळगाव मही परिसरातील गावांचा वीजपुरवठा अचानक बंद केला. यामुळे शेतकरी त्रस्त झाले. शेतकऱ्यांनी या संदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत तुपकर यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी वीज कंपनीचे विभागीय अभियंता श्री. कायंदे यांना घेराव टाकला. वीज कंपनीच्या कार्यालयाचा शेतकऱ्यांनी ताबा घेतला. बराच काळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर तुपकर यांनी कार्यालय पेटवण्याचा इशारा दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात अाला. या आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बबनराव चेके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे ,वाशीमचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जितेंद्र खंडारे, शेख जुल्फेकार, विष्णू देशमुख, कुंडलिक शिंगणे, गजानन मुंढे, मधुकर शिंगणे, मधुकर वाघ, पंढरीनाथ म्हस्के यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT