Electricity bill discount for loom holders Temporary suspension of the ban decision 
मुख्य बातम्या

यंत्रमाग धारकांच्या वीजबिल सवलत  बंदीच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती

वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बिलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बिलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत असून ऑनलाइन अर्ज प्रणाली अधिक सुलभ करणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी इचलकरंजी येथे बोलताना केले.

  इचलकरंजी येथील फुलचंद शहा गार्डन येथे शेख यांनी वस्त्रोद्योग व्यवसायातील अडचणी, समस्या संदर्भात यंत्रमाग संघटनांचे प्रतिनिधी, वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी तसेच विविध यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी आणि वस्त्रोद्योग व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला. 

श्री. शेख म्हणाले, पुढील वर्षी जाहीर होणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणापूर्वी यंत्रमागधारकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये  प्रत्येक यंत्रमाग बहुल जिल्ह्यातील प्रतिनिधींचा समावेश केला जाणार आहे. तसेच वस्त्रोद्योग व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण त्या-त्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरविताना वस्त्रोद्योगातील तज्ज्ञांच्या मताबरोबरच वस्त्रोद्योग व्यवसायात काम करणाऱ्या व्यावसायिकांची मते जाणून घेऊन राज्याचे सर्व समावेशक असे वस्त्रोद्योग धोरण ठरविले जाणार आहे.

नवीन वस्त्रोद्योग धोरणात कोणत्याही उद्योग घटकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली  जाणार आहे.वीज सवलतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कशी असावी या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्वांनी जुन्या दराप्रमाणेच वीजबिले भरावीत. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना ७५ पैसे अतिरिक्त वीजबिल सवलत देण्याबाबत येत्या महिन्याभरात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल.

या वेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू आवळे इंडस्ट्रिअल इस्टेटचे राहुल खंजिरे, यंत्रमाग संघटनेचे मदन कारंडे, विनय महाजन, सतीश कोष्टी, राजगोंड पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सागर चाळके, रवींद्र माने, राहुल आवाडे, संजय कांबळे, कैश बागवान, महादेव कांबळे, नितीन जांभळे यांच्यासह यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी, यंत्रमागधारक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT