Electricity and Vidarbha agitation of Vidarbha State Andolan Samiti on 7th June
Electricity and Vidarbha agitation of Vidarbha State Andolan Samiti on 7th June 
मुख्य बातम्या

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला आंदोलन

टीम अॅग्रोवन

अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती, नौकऱ्या, रोजगार सर्वच अडचणीत आलेले आहे. त्यामुळे हे संकट असेपर्यंत विदर्भाच्या सर्वच जनतेला वीज बिलातून मुक्त करा, यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ७ जूनला वीज व विदर्भ आंदोलन जाहीर केले आहे. समाज माध्यमांद्वारे हे आंदोलन केले जाणार आहे.

याबाबत संघटनेने म्हटले की, वीज विदर्भात तयार होते. शेती, कोळसा, पाणी विदर्भाचे वापरले जाते. प्रदूषणही विदर्भाच्याच वाट्याला आले आहे. आता कोरोनाचा मारही सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडे पैसा राहलेला नाही. अशा स्‍थितीत जनतेला दिलासा द्यायला हवा. याकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती ७ जूनला आंदोलन करीत आहे.  लॉकडाऊनचे नियम पाळून नागरिकांनी आपापल्या घरूनच वीज व विदर्भ आंदोलन करावे, असे आवाहन ॲड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे यांनी केले असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांनी दिली.

या आहेत मागण्या

  •  कोरोना असेपर्यंत विदर्भाच्या सर्वच जनतेला वीज बिलातून मुक्त करा
  • २०० यूनिटपर्यंत वीज बिल नको. त्यानंतरचे निम्मे करा
  • शेती पंपाच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करा
  • विदर्भाला वीज प्रकल्पाच्या प्रदूषणातून मुक्त करावे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

    Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

    SCROLL FOR NEXT