राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक 
मुख्य बातम्या

राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त असलेल्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी निवडणूक होणार असून, २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे.

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त असलेल्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी निवडणूक होणार असून, २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे. भारत निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता. ९) महाराष्ट्रासह, पश्‍चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे २०२१ पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसह राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ४ ऑक्टोबर २०२१ ला निवडणूक घेण्यात येणार असून, याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ रोजी अर्ज करण्याची अंतिम तारिख असून, २३ रोजी अर्जांची छाननी होणार आहे. २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून, सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT