एकनाथ खडसेंच्या  बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा  Of Eknath Khadse Pave the way for unopposed choice
एकनाथ खडसेंच्या  बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा  Of Eknath Khadse Pave the way for unopposed choice 
मुख्य बातम्या

एकनाथ खडसेंच्या  बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा 

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत अर्ज बाद ठरविल्यावर हरकत घेणारा मुक्ताईनगर सोसायटीतील उमेदवाराचा अर्ज विभागीय उपनिबंधकांनी फेटाळून लावला. त्यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  खडसे यांनी या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विकास सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत नाना पाटील यांनीही अर्ज भरला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज कर्ज थकबाकीमुळे बाद ठरविला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला नाना पाटील यांनी विभागीय उपनिबंधक, नाशिक यांच्याकडे अर्ज करत आव्हान दिले. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. नाना पाटील यांच्या बाजूने दिग्गज वकिलांनी बाजू मांडली. मात्र विभागीय उपनिबंधकांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांचे नामनिर्देशनपत्र बाद ठरविण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे खडसे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. नाना पाटील यांच्यासह स्मिता वाघ, खासदार रक्षा खडसे व अन्य एक अशा तीन हरकती विभागीय निबंधकांनी फेटाळून लावल्या आहेत.  स्मिता वाघ यांचा अमळनेर सोसायटी मतदारसंघातील अर्ज बाद केला होता. तर खासदार खडसे यांचा महिला राखीव व इतर मागासवर्गीय मतदारसंघातील अर्ज बाद झाला होता. बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे अर्ज बाद केले होते. त्यावर हरकतीचे अपील खासदार खडसे, वाघ, नाना पाटील आदींनी नाशिक येथील सहनिबंधक यांच्याकडे दाखल केले होते. त्यावर सुनावणी व इतर कार्यवाही झाली आणि त्यात हे अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे हे उमेदवार जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून बाहेर झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT