In the eastern part of Nashik district Pre-season cotton cultivation slowed down
In the eastern part of Nashik district Pre-season cotton cultivation slowed down 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पूर्वहंगामी कापूस लागवड मंदावली

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्याच्या सीमाभागातील गावांमध्ये दरवर्षी पूर्वहंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, यंदा या लागवडी कमी झाल्याचे चित्र आहे.

गुलाबी बोंडअळी निर्मूलनाच्या अंगाने सर्व लागवडी सोबत जून महिन्यात व्हाव्या, यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात चालू वर्षी २५ मेपर्यंत कापूस बियाणे विक्री बंद ठेवली होती. मात्र, बियाणे विक्री सुरू झाल्यानंतर एक आठवडाभर लागवडी उशिरा सुरू झाल्या आहेत. 

काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात लागवडीचे नियोजन करून बियाणे विक्रेत्यांकडे बियाण्यांची पूर्व नोंदणी केली होती. मात्र, २५ मे पर्यंत विक्रीबंद आदेशामुळे ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे लागवडी पुढे गेल्या. प्रामुख्याने या भागातील अमोदे, बोराळे, मळगाव, कळमदरी, जामदरी तसेच आसपासच्या गावांमध्ये लागवडी सुरू आहेत. मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या जातेगाव, बोलठाण, ढेकू, पिंपरी हवेली या भागात होणाऱ्या लागवडी सध्या थांबल्या असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने जून महिन्यात सोबत लागवडी करण्याचे आवाहन केल्याने परिणाम झाला आहे. 

ज्यांच्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, असे शेतकरी पर्यायी पीक म्हणून ऊस, पपई लागवडी करत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. त्यात यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकरी यावर्षी लागवडी कमी करत असल्याचे चित्र आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT