ई-नाम
ई-नाम 
मुख्य बातम्या

ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारक

टीम अॅग्रोवन

पुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-नाम) शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी खरेदीदारांना डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी बॅंकर्सची बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी कॅश क्रेडिटची साेय खरेदीदारांना उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  राज्यात दाेन टप्प्यांमध्ये ४५ बाजार समित्यांमध्ये ई-नाम राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. ई-नाममध्ये खरेदीदारांची क्षमता बघूनच त्याला खरेदीमध्ये उतरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी त्याची नाेंदणी पणन संचालनालयाकडे करण्यात येणार असून, खरेदीदाराला कॅश क्रेडिट एवढाच शेतमाल खरेदी करण्यात येणार आहे. सध्या कॅश क्रेडिटपेक्षा अधिक रकमेची खरेदी केली जाते. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याचा धाेका संभवत असल्याने शेतकऱ्यंची फसवणूक टाळण्यासाठी आणि खरेदी विक्री व्यवहारातील पैसे तातडीने मिळण्यासाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट देण्यात येणार आहे.  यासाठी राज्यातील विविध बॅकर्सची बैठक नुकतीच पणन संचालनालयाच्या वतीने मुंबईत घेण्यात आली. या बैठकीला पणन संचालक डॉ. अानंद जाेगदंड यांच्यासह सहकार आणि पणन विभागातील अधिकारी उपस्थित हाेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT