Due to untimely fall, there is a rush in the vineyards
Due to untimely fall, there is a rush in the vineyards 
मुख्य बातम्या

अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात धाकधूक

टीम अॅग्रोवन

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादक अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडले आहेत. अशातच मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने अवकाळीच्या सावटामुळे पूर्वहंगामी द्राक्ष पट्ट्यात धाकधूक वाढली आहे.

‘अधिक जोखीम अधिक दर’ या पद्धतीने शेतकरी सटाणा, देवळा, मालेगाव, चांदवड व कळवण तालुक्याच्या काही भागात पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेतले जाते. गेल्या एक महिन्यापासून पूर्वहंगामी द्राक्ष काढणीच्या कामांना वेग आला आहे. ढगाळ वातावरणासहीत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने अवकाळीच्या सावटाखाली शेतकरी आहे.पूर्वहंगामी द्राक्ष शेतीला दुप्पटचा खर्च येत असल्याने आव्हानांना समोर जावे लागत आहे. अनेक संकटात पुन्हा एकदा उमेदीने सलग तिसऱ्या वर्षी दृष्ट लागावी अशा बागा तयार केल्या. मात्र, उत्पादन घेऊन मातीमोल होण्याची भीती आहे. पूर्वहंगामी द्राक्ष पिकाचा कालावधी डिसेंबरअखेर असतो. त्यामुळे चालू वर्षांपासून लागू केलेला द्राक्ष हंगामाचा जोखीम काळ १ जुलै ते ३० डिसेंबर धरण्यात यावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी  नुकसान होऊन भरपाई व उपाययोजना नसल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये शेकडो एकर तयार द्राक्ष माल वेलीवरच मातीमोल झाला. तयार मालाला तडे जाऊन सड झाली. हे नुकसान झाल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांसह शासकीय यंत्रणेनेद्वारे झाले. मात्र, काहीच पदरी न पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी आहे.शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून फुकटचे नको मात्र शाश्वत पर्याय द्या, अशी मागणी होऊ लागली आहे. 

एकीकडे पदरमोड करून पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घ्यायचे त्यात होणारे नुकसान न सोसणारे आहे. राज्य सरकारकडे आच्छादनासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पिकवून सुद्धा अडचणीत आहोत. द्राक्ष शेती संकटात सापडल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष क्षेत्र कमी होण्याची भीती आहे. - कृष्णा भामरे, माजी संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

नाशिक जिल्ह्यात ३० नोव्हेंबरनंतर २ डिसेंबरदरम्यान मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते. या काळात काढणीस आलेल्या द्राक्ष बागावर रूफ-टॉप-कव्हर सुविधा असल्यास बाग अच्छादित करावे तर खरीप लाल कांदा ३ तारखेनंतर काढावा.  - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान विभाग, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT