संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ करणार करडईवर प्रक्रिया

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः २०० देशी गाईंचे संगोपन करीत त्या माध्यमातून दुधाचा ब्रॅंड काढण्याची संकल्पना मांडणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आता करडई लागवड करीत त्यावर प्रक्रिया करण्याचा विचार सुरू केला आहे. उत्पादित करडई तेलाची विक्री पहिल्या टप्प्यात विद्यापीठ कर्मचाऱ्यांना करण्याचे प्रस्तावित आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. विलास भाले यांनी वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला. त्यानंतर विद्यापीठाला आर्थिक स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पूरक उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्याअंतर्गत सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानंतर गीर, साहिवाल जातीच्या २०० गाईंचे संगोपनाचा प्रकल्पदेखील विद्यापीठ लवकरच राबविणार आहे. या माध्यमातून संकलित होणाऱ्या दुधाचा ब्रॅंड तयार करून त्याची विक्री करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. याच प्रयत्नात आर्थिक स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पूरक ठरू पाहणाऱ्या आणखी एका उपक्रमाची जोड देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

त्यामध्ये करडईपासून तेलनिर्मिती करत त्याची विक्री करण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात सुमारे ७० हेक्‍टरवर करडई लागवड केली आहे. या क्षेत्रात आणखी वाढ करण्याचा विचार आहे. त्यानंतर करडई लागवडीखालील एकूण क्षेत्र ८० ते ८५ हेक्‍टरपर्यंत जाईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT