डाऊनीचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्ष बागांमध्ये फवारण्या सुरु आहे
डाऊनीचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्ष बागांमध्ये फवारण्या सुरु आहे 
मुख्य बातम्या

दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा प्रादुर्भाव 

टीम अॅग्रोवन

नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक तालुक्यांत बहुतांश भागांत शनिवारी (ता. १९) दुपारपासून पाऊस थोड्या फार प्रमाणात सुरू आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या पावसाने द्राक्ष बागांच्या हंगामात अडचणी येत आहेत. सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफुट, डिपिंग या अवस्थेत असल्याने या पावसामुळे बागांना धोका निर्माण झाला आहे. फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये मणीगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तसेच, डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी भर पावसात फवारणी करताना दिसत आहेत. 

जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरात पाऊस होत आहे. सध्या द्राक्ष बागा विविध अवस्थांमध्ये आहेत. काही बागांच्या छाटण्या सुरू आहेत. काही बागा पोंगावस्थेत आहेत. काही बागा फेलफुट ते कळीच्या डीप अवस्थेत आहेत. या हवामानामध्ये सगळ्यात जास्त धोका दोडा अवस्थेपासून मणीधारणा अवस्थेपर्यंतच्या बागांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक योजना सुरू केल्या आहेत. डिझेलचे दर वाढल्याने बुरशीनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT