Do not take away the weeds that come with the hands of the farmers
Do not take away the weeds that come with the hands of the farmers 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ नका

टीम अॅग्रोवन

सिन्नर, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात महावितरणकडून थकीत देयके भरावी यासाठी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या कारवाईस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ नका, अशी मागणी केली आहे. 

शेतीपंपांची थकबाकी भरण्यासाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळ कांदा लागवडीस बसत आहे. महावितरणकडून वसुलीचा बडगा उगारल्याने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अगोदरच शेतीसाठी दिवसा व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही, अशा परिस्थितीत महावितरणची देयके चुकती करायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

पांगरी परिसरातील सर्वच फीडरवरील वीजपुरवठा बंद करून अडवणूक केली जात असल्याचे मुद्द्यावर वावी येथील महावितरणच्या कार्यालयात येत ४० ते ५० शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. महावितरणच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. 

शेतकरी थकबाकी टप्प्याटप्प्याने भरतील मात्र वीज खंडित करून पिकांचे नुकसान करू नका, असे सांगत वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी ‘स्वाभिमानी’चे तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, कृष्णा घुमरे, बारकू पगार, बाबासाहेब पांगारकर, रामदास पगार, गणेश डुकरे, रामदास डुकरे, बाबासाहेब कलकत्ते, आनंदा वारुळे, सोमनाथ पांगारकर, जगन्नाथ पगार, किसन वारुळे, पुंजाहरी पगार, बबन डुकरे, सुभाष डुकरे यावेळी उपस्थित होते.

महावितरणने अडवणूक करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. दुष्काळी परिस्थितीत प्यायला पाणी नसताना देखील अवाच्या सव्वा देयके शेतकऱ्यांना देण्यात आली. ही देयके थकबाकीतून वगळावीत. सौर वीजपंप बसवण्यासाठी सरकारने कर्ज स्वरूपात अर्थसाह्य करावे.             - आत्माराम पगार, तालुकाध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT