पुणे ः पहिला हप्ता व मागील बाकी दिल्याशिवाय गाळप परवाने देऊ नका या मागणीचे निवेदन साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांना देण्यात आले.
पुणे ः पहिला हप्ता व मागील बाकी दिल्याशिवाय गाळप परवाने देऊ नका या मागणीचे निवेदन साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांना देण्यात आले. 
मुख्य बातम्या

बाकी न देणाऱ्या कारखान्यास गाळप परवाने देऊ नका

टीम अॅग्रोवन

सातारा : मागील हंगामात विनापरवाना ऊस गाळप करणाऱ्या, तसेच गतहंगामातील बाकी ऊस बिल न देता सुरू केलेल्या कारखान्यास गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेने साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतेच साखर आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, गतहंगामातील उसाला सातारा जिल्ह्यात अनेक कारखान्यांनी ४०० ते ६०० रुपयांने कमी ऊस बिल दिले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

तसेच रयत सहकारी कारखान्याने मागील हंगामातील जवळपास १४ कोटी रुपये बुडविले असून, गाळप परवाना नसतानाही ऊस गाळप केले आहे. मागील बाकी मिळेपर्यंत रयत कारखान्यास गाळप परवाना देऊ नये.

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दोन प्रकारे ऊस बिल देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. साखर कारखान्यांनी मागील हंगामातील ऊस बिल द्यावे तसेच या हंगामातील पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय कारखान्यास गाळप परवाने देऊ नका; अन्यथा साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या वेळी संस्थापक अध्यक्ष बी. जी. काका पाटील, जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT