परभणी जिल्ह्यात तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल २४ किलो
परभणी जिल्ह्यात तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल २४ किलो 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल २४ किलो

टीम अॅग्रोवन

परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामातील तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ४ क्विंटल २४ किलो (एकरी १ क्विंटल ६९६ किलो) एवढी आली आहे. संयुक्त पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षाच्या विश्लेषणानंतर हे स्पष्ट झाले. गतवर्षी (२०१७-१८) च्या प्रतिहेक्टरी तूर उत्पादकतेच्या तुलनेत यंदा प्रतिहेक्टरी १० क्विंटल ६६ किलोने घट आली. २०१२-१३ ते २०१६-१७ या पाच वर्षांतील सरासरी उत्पादकतेपेक्षा प्रतिहेक्टरी १ क्विंटल ६२ किलोने घट आली आहे.

यंदाच्या हंगामातील तुरीची उत्पादकता निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे एकूण १४४ पीककापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते. या सर्व पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षाचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याची तुरीची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ४ क्विंटल २४ किलो एवढी आल्याचे आढळून आले आहे.

गतवर्षी जिल्ह्याची तुरीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता १४ क्विंटल ९० किलो एवढी आली होती; तर २०१२-१३ ते २०१६-१७ या पाच वर्षांर्ची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ८६ किलो एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रतिहेक्टरी १० क्विंटल ६६ किलोने तर पाच वर्षांतील तुरीच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत १ क्विंटल ६२ किलोने घट आली आहे. यंदा जिल्ह्यात परभणी तालुक्याची तुरीची प्रतिहेक्टरी उत्पादकता सर्वाधिक म्हणजे ६ क्विंटल ४५ किलो (एकरी २ क्विंटल ५८ किलो) एवढी आली. पालम तालुक्यात तुरीची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे प्रतिहेक्टरी २ क्विंटल ३६ किलो (एकरी ९४ किलो) एवढी आली. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

तालुकानिहाय प्रतिहेक्टरी तूर उत्पादकता (क्विंटलमध्ये)
तालुका उत्पादकता
परभणी ६.४५
जिंतूर ३.५६
सेलू २.५३
मानवत ५.५६
पाथरी २.६३
सोनपेठ ४.९८
गंगाखेड ४.५०
पालम २.३६
पूर्णा ४.७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT