Distribution of farm lining grants to farmers in Aurangabad district 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात शेततळे अस्तरीकरणाचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेततळे अस्तरीकरणाचे अनुदान जवळपास अठरा महिन्यांपासून रखडले होते. आता ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात झाली आहे.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेततळे अस्तरीकरणाचे अनुदान जवळपास अठरा महिन्यांपासून रखडले होते. आता ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाडळी, लाखेगाव येथील शेतकऱ्यांनी  ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून रखडलेल्या शेततळे अस्तरीकरणाच्या अनुदानाविषयी आवाज उचलला होता. त्यांनी मे २०२० मध्ये शेतकऱ्यांची शेततळी होऊन व अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले. परंतु जवळपास १८ महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही संबंधित शेततळे योजनेच्या नियमानुसार दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांनी पदरमोड उसनवार व कर्ज घेऊन शेततळ्याची काम पूर्ण केले. परंतु अनुदान मिळण्यास होणारा विलंब लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत होता. 

यंत्रणेकडून ''बजेट'' आल्यानंतर अनुदान खात्यावर जमा करू, असे उत्तर मिळते. बजेट नव्हते तर योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकण्याचे प्रयोजन काय? असेही शेतकऱ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, कृषी विभागाकडून जिल्हाभरातील शेततळे अस्तरीकरणाचे अनुदान देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. जिल्ह्यातील तब्बल ४६९ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. 

अनुदानापोटी जवळपास ३ कोटी १५ लाख रुपये जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी ४०० च्या वर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान येत्या दोन दिवसांत अनुदान दिले जाईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT