Distribution of 48% crop loan in Pune district 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात ४८ टक्के पीककर्जाचे वाटप

पुणे : पुणे जिल्हा बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत २८३ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये म्हणजेच ४८ टक्के कर्जवाटप केले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे जिल्हा बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत २८३ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये म्हणजेच ४८ टक्के कर्जवाटप केले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी बॅंकेने रब्बीसाठी एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीककर्जात जवळपास २९ कोटींनी वाढ केली आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु त्या वेळी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

यंदाही पुणे जिल्हा बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देते. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करण्यात येत आहे.

रब्बी पिकांव्यतिरिक्त बँक ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांसाठी पीककर्जाचे वाटप करत आहे. रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT