खारपाणपट्ट्यात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा
खारपाणपट्ट्यात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा  
मुख्य बातम्या

खारपाणपट्ट्यात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  ः जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांची दिल्लीत भेट घेत चर्चा केली.  अधिवेशनादरम्यान तोमर यांची भेट घेत बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, नांदुरा, मलकापूर आदी तालुक्यातील गावांमध्ये पाण्यामध्ये अधिक क्षारांचे प्रमाण असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हा भाग खारपाण पट्ट्यात मोडत आहे. वर्षानुवर्षे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे लोकांना किडनीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. काहींचे मृत्यूसुद्धा यामुळे झालेले आहेत. या प्रश्नावर केंद्राने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी असलेले निवेदन खासदार जाधव व आमदार फुंडकर यांनी या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडे सुपूर्द केले. श्री. तोमर यांनी या गंभीर प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत लक्ष देणार असल्याचे सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT