Direct sale of grapes from ‘Sitai’ 
मुख्य बातम्या

‘सीताई’कडून ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्री

सीताई नॅचरल फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या द्राक्षाच्या अमृतम या द्राक्षाच्या ब्रॅण्डचे लोकार्पण कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते पुण्यात नुकतेच करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सीताई नॅचरल फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या द्राक्षाच्या अमृतम या द्राक्षाच्या ब्रॅण्डचे लोकार्पण कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते पुण्यात नुकतेच करण्यात आले.

या वेळी सीताई नॅचरल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे तंत्रज्ञान प्रमुख गुरू महागुरू, सीताई नॅचरल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन शिवाजीराव बोडखे, प्रगतिशील शेतकरी भारत रानरुई, पोपट देठे या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना कृषी आयुक्त धीरजकुमार म्हणाले, की या द्राक्षांची चव आणि रंग खूपच वेगळा आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता मोठी आहे. शेतकऱ्यांनी असे प्रयोग करणे आवश्यक आहे, असे सांगितले. या संपूर्ण द्राक्षाच्या पॅकिंग, ब्रॅण्डिंग आणि अन्य तांत्रिक तपासण्यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, समन्वयक नानासाहेब कदम यांनी साह्य केल्याचे या वेळी सांगण्यात आले. आता या द्राक्षासाठी पुण्यातील कोथरूड, हडपसर, पिंपळे सौदागर याठिकाणी विक्री केंद्रे असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT