Difficulties in issuing FRP due to low sugar rates: Vaibhav Nayakwadi
Difficulties in issuing FRP due to low sugar rates: Vaibhav Nayakwadi 
मुख्य बातम्या

कमी साखर दरामुळे ‘एफआरपी’ देण्यात अडचणी ः वैभव नायकवडी

टीम अॅग्रोवन

वाळवा, जि. सांगली ः साखरेचे दर प्रतिक्विंटल अजून वाढले पाहिजेत. त्याशिवाय उसाची किमान आधारभूत किंमत देण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार नाही, असे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी येथे केले.

कारखान्याच्या ४० व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीने झाली. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी विषय वाचन केले. सुरुवातीला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

श्री. नायकवडी म्हणाले, की जागतिक बाजारपेठेत फक्त साखर उत्पादनावर अवलंबून न राहता साखरे बरोबरच उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे. ब्राझीलसारख्या देशाने उपपदार्थ निर्मिती करून साखरेच्या मागणीतील चढ- उतारावर सक्षम पर्याय उभा केला आहे. शासनाने जीएसटी रक्कमेतून काररखान्याना मदत करावी. देशाला गरजेइतके साखर उत्पादन करून तेवढाच साठा करावा. साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य द्यावे. शिवाय इतर उपपदार्थ निर्मितीला पोषक वातावरण निर्माण करावे.

श्री. नायकवडी म्हणाले, की साखर दर आणि एफआरपीचा मेळ घालण्यात साखर कारखान्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यांना प्रतिटन पाचशे रुपये अनुदान द्यावे. कारखान्याला २४ मेगावॉट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पासह कारखान्याची दैनिक गाळपक्षमता ५००० टन करण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पाची दैनंदिन क्षमता एक लाख लिटर करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक अडचणी आहेत. तरीही हुतात्मा साखर कारखान्याने सातत्याने उसाला उच्चांकी दर दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT