Destruction of vegetable crops in Parbhani district
Destruction of vegetable crops in Parbhani district 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडी

टीम अॅग्रोवन

परभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील उभ्या भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे. बाजारभावातील तेजीच्या दिवसात दररोजच्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

रविवार (ता.११) ते  गुरुवार (ता.२२) या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे पालक, चुका, शेपू, कोंथिबीर आदी पालेभाज्या, टोमॅटो, वांगी, मिरची, कारले, दोडके, काकडी, चवळी, वाल, गवार, भेंडी, कोबी आदी भाजीपाला पिके पाण्यात बुडाली. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले. त्यामुळे उभी पिके कुजली आहेत. टोमॅटो, दोडके, कारले पिकांसाठी लावलेले बांबू आणि तारांचे मांडव मोडून पडले आहेत. जोरदार प्रवाहामुळे जमिनी खरडून गेल्या. विहिरी गाळाने भरल्या आहेत. 

ठिबक, तुषार संच वाहून गेले. परभणी तालुक्यातील सिंगणापूर, इटलापूर, बोरवंड, मिरखेल, देशमुख पिपंरी, खानापूर, वांगी, आसोला, आर्वी, गोविंदपूरवाडी आदी गावे, सेलू तालुक्यातील मोरेगाव, पाथरी तालुक्यातील माळीवाडा आदी प्रमुख भाजीपाला उत्पादक गावातील शेतकरी दररोज परभणी शहर तसेच प्रमुख बाजारपेठांच्या गावात भाजीपाला विक्री करतात. जुलै महिन्यात भाजीपाल्याचे दर वधारलेले असतात. परंतु यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. अधून-मधून पाऊस सुरुच आहे.

त्यामुळे शेतामधील पाण्याचा निचरा होत नाही. उत्पादन सुरु झाले असताना पिके हातची गेल्याने उत्पन्न बुडाले शिवाय खर्च वाया गेला आहे. पीकहानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली. 

वर्षभर नियमित भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतो. ढगफुटीमुळे एक एकरावरील विविध प्रकाराचा भाजीपाला, अर्धा एकर मिरची संपूर्णपणे सडून गेली आहे. शेतातून पाणी हटत नाही. नवीन लागवड लवकर शक्य नाही. दररोज ७०० ते ८०० रुपयाचे उत्पन्न बंद झाले. - पंडित थोरात, खानापूर, ता. परभणी.

गावातील १० ते १५ एकरवरील विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचे पुराच्या पाण्यामुळे नासाडी झाली. बांबू, तारांचे मांडव मोडून पडले. सिंचनाचे साहित्य वाहून गेले. विहरी गाळाने भरल्या. अतोनात नुकसान झाले. - संभाजी गायकवाड, मिरखेल, ता. परभणी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT