संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पावसामुळे लांबला कापसाचा हंगाम

या वर्षी सततच्या पावसामुळे तण व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता खर्च देखील वाढला. दिवाळीपूर्वी अर्धा अधिक कापूस घरी यायचा पण या वर्षी असे झाले की बोंडभर कपूस देखील घरी आला नाही. भरक जमिनीवरची तीच स्थिती असून, दोन, चार बोंडे लागलेली आहेत व ती फुटली देखील, परंतु पुन्हा बोंड लागण्याची शक्‍यता नाही. - किसन जोगी, कापूस उत्पादक शेतकरी,वडकी, जि. यवतमाळ

टीम अॅग्रोवन

राळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम लांबल्याने उत्पादकतेत घट येण्यासोबतच कापूस विकून दिवाळी साजरी करणेही या वेळी शेतकऱ्यांना शक्‍य होणार नसल्याची स्थिती आहे. राळेगाव तालुक्‍यात या वर्षी सुमारे ४७ हजार ९३ हेक्‍टरवर कापसाची लागवड आहे.  यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापसाखालील क्षेत्र आहे. कोरडवाहू कापूस या भागात बहुतांश शेतकरी घेतात. त्यामुळे उत्पादकतेबाबत दरवर्षीच अनिश्‍चितता राहते. गेल्या वर्षी कमी पावसामुळे उत्पादकतेत घट नोंदविण्यात आली. या वर्षी मात्र पावसाचा फटका कापूस पिकाला बसला आहे.

भारी जमिनीतील कापसाला बोंडच धरली नसल्याने हंगाम लांबण्याची भीती वर्तविली जात आहे. हलक्‍या जमिनीत कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीला बोंड धरली आणि ती फुलली देखील. परंतु या जमिनीत दुबार वेचा होण्याची शक्‍यता कमी असल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी नोंदविले आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी कापसाचा पहिला वेचा होतो. बाजारात त्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांद्वारे याच पैशाचा वापर दिवाळी सण साजरा करण्यासाठी केला जातो. त्याच पार्श्‍वभूमीवर कापूस पणन महासंघ व सीसीआयकडून देखील दिवाळीच्या काळातच खरेदी केंद्र सुरू केली जातात. या वर्षी मात्र या केंद्राबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. 

संततधार पावसामुळे कापसाच्या उत्पादकतेवर निश्‍चितच परिणाम होणार आहे. दिवाळीतच कापूस घरात येतो, अशी स्थिती दरवर्षी राहते. त्याच पैशावर शेतकरी दिवाळी साजरी करतात. या वर्षी मात्र पावसामुळे हंगाम लांबला आहे, अशी माहिती राळेगावचे तालुका कृषी अधिकारी  डी. एस. प्रधान यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT