Decrease in production of urad, muga 
मुख्य बातम्या

उडीद, मुगाच्या उत्पादनात घट 

नांदेड जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. यंदा मुगाचे हेक्टरी उत्पादन ४८२ किलो, तर उडदाचे हेक्टरी ४१२ किलो उत्पादन आल्यामुळेउत्पादनात घट झालीआहे.

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. यंदा मुगाचे हेक्टरी उत्पादन ४८२ किलो, तर उडदाचे हेक्टरी ४१२ किलो उत्पादन आल्यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचेही समोर येत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  जिल्ह्यात यंदा जून व जुलैमध्ये अपुरा पाऊस त्यात पडलेला खंड याचा मोठा परिणाम या उडीद व मुगाच्या खरीप पिकांवर झाला आहे. त्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड, धर्माबाद या तालुक्यांत उडीद तसेच मुगाचे उत्पादन घेतले जाते. परंतु पिकांच्या संवेदनशील काळातच पावसाने ओढ दिल्यामुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या पिकाच्या लागवड क्षेत्रात हेक्टरी किती उत्पादन झाले, याची मोजणी करण्यासाठी उडदाचे ४०२ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. यानुसार उडदाचे हेक्टरी ४१२ किलो आले आहे. तर मुगाचे २८६ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. यातून मुगाचे हेक्टरी ४८२ किलो उत्पादन आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. हे पीक कापणी प्रयोगात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक तसेच पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीसमोर निर्धारित प्लॉटवर पीक मोजणी करण्यात आली. जिल्ह्यातील मूग, उडीद पिकांचे कापणी प्रयोग नुकतेच पूर्ण झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT