नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना घडली. हे खरे आहे का आणि त्याबाबत शासनाने काय चौकशी केली, असा सवाल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण या
नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना घडली. हे खरे आहे का आणि त्याबाबत शासनाने काय चौकशी केली, असा सवाल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण या 
मुख्य बातम्या

आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली द्राक्ष उत्पादकांची व्यथा

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना घडली. हे खरे आहे का आणि त्याबाबत शासनाने काय चौकशी केली, असा सवाल बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी शासनाला केला. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१८) तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाला जाब विचारला. या प्रश्नाबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून, दोन्ही प्रकरणांत गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.    अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१८) आमदार चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील बिजोटे व चांदवड तालुक्यातील वडाळीभोई, कुंडाणे,धोडंबे, मालसाने, शिंदे येथील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे एक कोटी ९० लाख रुपये रुपयांची फसवणूक करून निर्यातदार पळून गेल्याची घटना २२ एप्रिल २०१९ रोजी घडली आहे. त्यामुळे याप्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली काय आणि त्यानुसार फसवणूक करणाऱ्या निर्यातदार आरोपींविरोधात शासनाने काय कार्यवाही केली, अशी विचारणा आ.चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.  याप्रकरणी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस स्टेशनमध्ये भादवि कलम ४२९,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच  दुसऱ्या एकाप्रकरणी ओझर पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल असून तपास सुरू असल्याचेही शासनाकडून सांगण्यात आले. आमदार चव्हाण यांनी अधिवेशनादरम्यान फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहासमोर मांडल्याने शेतकरी वर्गाकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT