कृषिभूषण काळे यांनी  विकसित केले ‘दनाका' द्राक्ष वाण
कृषिभूषण काळे यांनी विकसित केले ‘दनाका' द्राक्ष वाण 
मुख्य बातम्या

कृषिभूषण काळे यांनी विकसित केले ‘दनाका' द्राक्ष वाण

टीम अॅग्रोवन

सोलापूर : राज्यभरातील द्राक्ष क्षेत्रात शरद, सोनाका, नानासाहेब पर्पल, सरिता सीडलेस यांसारख्या निवड पद्धतीने (सिलेक्शन) विविध वाणांची मालिका देणाऱ्या नान्नज येथील काळे कुटुंबीयांतील कृषिभूषण दत्ता काळे यांनी आता याच श्रेणीतील दनाका सीडलेस (दत्तात्रय नानासाहेब काळे) या नावाने आणखी एक द्राक्ष वाण विकसित केले आहे. काळे कुटुंबीयांनी विकसित केलेले हे पाचवे वाण आहे. या वाणाचे पहिले उत्पादन काळे यांनी यंदाच्या मार्चमध्ये एकरी १२ टन याप्रमाणे घेतले आहे.  कृषिभूषण दत्तात्रय काळे यांचे नाव द्राक्ष क्षेत्रामध्ये सर्वपरिचित आहे. काळे यांचे वडील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक (कै.) नानासाहेब यांनी विकसित केलेल्या सोनाका, शरद सीडलेस नंतर दत्तात्रय यांनीही सरिता, नानासाहेब पर्पल यासारखी वाणे विकसित केली. अभ्यास आणि निरीक्षणशक्तीतून दत्तात्रय यांनीही आता पुन्हा एकदा द्राक्षाच्या दनाका या वाणाचे संशोधन केले आहे. गुणवत्ता, चव, आकार, रंग या सगळ्याच पातळीवर त्यांच्या या नव्या वाणाने अल्पावधीतच द्राक्ष उत्पादकांच्या मनात स्थान मिळवले आहे.  अशी आहेत वैशिष्ट्ये 

  • मण्याची लांबी दीड इंच
  • देठाजवळ मजबुती असल्याने फ्लॉवरिंगमध्ये गळ होत नाही 
  • द्राक्षमणी देठापासून ओढला तरी सुटत नाही
  • द्राक्षमण्याची जाडी १७ ते १८ मिमीपर्यंत होते
  • मणी सेटिंग झालेला घड हात लावला असता मणी घट्ट चिकटलेले जाणवतात 
  • मण्याचा रंग दुधी येतो
  • द्राक्षमण्याला गर भरपूर असल्याने मण्यांची चव कुरकुरीत लागते
  • देठाला मणी जिथे लगललेला असतो त्याच्या आत म्हणजेच ब्रश अर्धा इंचापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला मजबूती येऊन मणीगळ होत नाही
  • गोडी छाटणीनंतर वाण १२० दिवसांत तयार होते.
  • द्राक्षकाड्या, घडातील वेगळेपणातून काही अभ्यासू शेतकरी असे द्राक्षवाण विकसित करतात, आमच्याकडेही त्या काड्या निरीक्षणासाठी येतात. आम्हीही त्यावर काम करतो. मुख्यतः अभ्यास आणि निरीक्षणशक्ती त्यासाठी महत्त्वाची आहे.  - डॉ. एस. डी. सावंत, केंद्र संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे  आतापर्यंत आमच्या सगळ्याच वाणांविषयी द्राक्ष उत्पादकांमध्ये विश्‍वासार्हता आहे. याही वाणाला मागणी वाढेल, असा विश्‍वास आहे. निर्यातीसाठीहीसुद्धा तो चालेल. यंदाच्या मार्चमध्ये त्याचे पहिले उत्पादन एकरी १२ टनांप्रमाणे मला मिळाले आहेत. शेतकऱ्यांना या वाणाच्या काड्या देत आहे.  - कृषिभूषण दत्तात्रय काळे, नान्नज, ता. उत्तर सोलापूर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

    Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

    Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

    Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

    Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

    SCROLL FOR NEXT