पावसामुळे झेंडू उत्पादकांचे नुकसान
पावसामुळे झेंडू उत्पादकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

वाशीम : पावसामुळे झेंडू उत्पादकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

वाशीम  ः परतीच्या पावसामुळे झेंडू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. झेंडूची झाडे जमिनीवर पडल्याने फुलांना माती लागून त्याचा चिखल झाला. यामुळे झेंडूच्या दरांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने दिवाळीत या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. रिसोड तालुक्यात शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच फुलशेतीला प्राधान्य देत असतात. गेल्या काही वर्षांत झेंडूची शेती या तालुक्यात विस्तारत आहे. या वर्षी दसऱ्याला झेंडू फुलांना अपेक्षित दर मिळाला नाही. आता सततच्या पावसाने फुलांचा दर्जा खालावला आहे. तोडणीला आलेली फुले खराब झाली आहेत. दिवाळीसाठी फुले तोडण्यापूर्वीच पावसामुळे झाडे कोलमडली. फुले जमिनीला लागल्याने त्यावर माती चिकटली. यामुळे फुलांचे नुकसान झाले. 

माझ्याकडे सहा एकर शेती आहे. एक एकरात झेंडूची लागवड केली होती. आमच्या गावात १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दीडशे एकरावर झेंडूची लागवड केली आहे. मतमोजणी झाल्यानंतर आम्ही २५ ऑॅक्टोबरला फुलांची तोडणी करणार होतो. वाहतुकीसाठी वाहनही सांगितले होते. परंतु, रात्री झालेल्या पावसाने झेंडू पडला आहे. फुले पाणी व मातीने खराब झाली. - रामदास विठ्ठल चुनडे,  एकलपूर, ता. रिसोड जि. वाशीम      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT