रानडुकरांकडून मका पिकाचे नुकसान
रानडुकरांकडून मका पिकाचे नुकसान 
मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात रानडुकरांकडून उभ्या पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, आरणगाव, नागरगाव, वडगाव रासाई, दहिवडी, पारवडी, राक्षेवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी आदी गावांतील परिसरात रानडुकरे धुमाकूळ घालत उभी पिके आडवी करून, हरभरा, भुईमूग, मका, ऊस, टोमॅटो, विविध चारा पिके आदींचे मोठे नुकसान करीत आहेत. 

शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागातील मुळा-मुठा, भीमा नदीच्या काठच्या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. पाणी व आडोसा यामुळे या भागात रानडुकरांची संख्या वाढलेली आहे. वनविभागाकडून रानडुकरांबाबत मार्गदर्शन होण्याची गरज आहे. या परिसरातील गावांत रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काही ठिकाणी रानडुकरांकडून ग्रामस्थांसह शेतकऱ्यांवर हल्ले झाले आहेत. 

शेताला तारेचे कुंपण केले तरीही रानडुकरे शेतात प्रवेश करतात. अगदी हातातोंडाशी आलेली हरभरा, भुईमूग, मका, ऊस, टोमॅटो, चारा पिके, फ्लॉवर, कोबी, कलिंगड, काकडी आदी पिकेही रानडुकरे एका रात्रीत आडवी करत आहेत, तसेच मल्चिंग पेपरचेही नुकसान करतात. रांजणगाव येथील शेतकरी संतोष लोखंडे यांचे उसाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात रानडुकरांनी नुकसान केले आहे. 

या परिसरात वेळोवेळी झालेल्या नुकसानीचे वनविभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळवून द्यावी. या जनावरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT