soybean damage
soybean damage  
मुख्य बातम्या

नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार हेक्टरला फटका 

टीम अॅग्रोवन

नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यातही आला आहे. 

अतिवृष्टी व पुरामुळे सिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सोडल्यामुळे जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवणी, कुही, रामटेक व सावनेर आदी तालुक्यांतील ६१ वर गावे बाधित झालीत. यात ४ हजार ९११ कुटुंबाचा तर २८ हजार १०४ नागरिकांचा समावेश आहे. महसूल विभागातर्फे यापूर्वीच बाधित क्षेत्रातील शेतीसह, नागरी भागातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. पुरामुळे १६०२ जनावरे मृत्यू पावलेत, ७७६५ घरांची पडझड झाली. ५० जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.  या पुराचा सर्वाधिक फटका हा खरीप पिकांना बसला आहे. जिल्ह्यात यंदा खरिपाचे एकूण क्षेत्र ५ लाख १०० हेक्टर इतके नियोजित करण्यात आले होते. त्यामध्ये या सातही तालुक्यांमध्ये खरिपाचे एकूण क्षेत्र हे २ लाख ६७ हजार ९००.९८ हेक्टर इतके असून २९ हजार २६२.११ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोरडवाहूतील २७८२९.८५ हेक्टर, ओलिताखालील १३५२.४७ हेक्टर ७९.७९ हेक्टरमधील बहुवार्षिक पिकांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, धान या मुख्य पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांवर चांगलेच संकट कोसळले आहे. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचेही पथक जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी आपला अहवाल केंद्राकडे सादर केल्याचे सांगण्यात आले. 

तालुकानिहाय एकूण क्षेत्र व पुरामुळे नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टर) 

तालुका एकूण क्षेत्र नुकसानग्रस्त क्षेत्र 
कामठी २५६२९.९७ ९८७.६७ 
मौदा ४९६७३ १९४९.५४ 
नरखेड ४४००१.९९ ६२०.२ 
रामटेक २८००४.४५ ६७.४ 
पारशिवनी ३३८५५ २२२४.०५
सावनेर ४१४३४.९ ६५८५.१४ 
कुही ४५३०१.६७ १६८२८.११ 
एकूण २६७९००.९८ २९२६२.११ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT