cotton seed 
मुख्य बातम्या

बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित निघाल्याप्रकरणी न्यायालयात खटला

या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या बीटी कपाशी बियाण्याचे नमुने अप्रमाणित निघाल्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध अकोला न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या बीटी कपाशी बियाण्याचे नमुने अप्रमाणित निघाल्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध अकोला न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच सोयाबीन बियाणे प्रकरणात तेल्हारा येथे खटला नोंदविण्यात आला. अप्रमाणित बियाणे प्रकरणी जिल्ह्यात आत्तापर्यंत आठ कंपन्यांविरुद्ध खटले दाखल केल्या गेले आहेत. जिल्हा परिषद कृषी विभागाने बीटी कपाशी वाणाचे दोन नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. हे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळल्यामुळे कंपनीविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागितला होता. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बीटी बियाण्याप्रकरणी अकोला न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.   जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी मिलींद जंजाळ यांनी यावर्षी मे महिन्यात संबंधित कंपनीच्या अकोट मार्गावरील गोदामातून बीटी कपाशीच्या वाणाचे दोन नमुने घेतले होते. सदर बियाण्यांमध्ये एक जनुक (जीन) जास्त आढळल्याचा ठपका प्रयोगशाळेने ठेवला आहे. त्यावर कंपनीने खुलासा सादर केल्यानंतर तो असमाधानकारक असल्याने कृषी विभागाने कंपनीविरोधात न्यायालयात खटले दाखल केले.

तेल्हारा येथे सोयाबीन प्रकरणी खटला अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी तेल्हारा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. सदर कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेत कमी आढळून आले होते. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत न्यायालयात खटला नोंदवला. जिल्ह्यात यापूर्वी मूर्तिजापूर येथे दोन, बार्शीटाकळी येथे तीन कंपन्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT