देशी कापूस वाण  
मुख्य बातम्या

हेक्टरी ४० क्विंटल उत्पादन देणारे देशी कापूस वाण विकसित

वाणाची चाचणी घेताना बिजोत्पादनाचा उद्देश नसतो. वाणाच्या प्रसारणाला मान्यता मिळाल्यानंतर बिजोत्पादनावर भर दिला जातो. त्यामुळे सध्या या देशी वाणाचे पुरेसे बियाणे उपलब्ध नाही. परिणामी शेतकऱ्यांना चाचणीकरिता फार थोडेच बियाणे देणे शक्‍य होणार आहे. एकरी अडीच किलो बियाणे लागते. संस्थेकडे बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्याकरिता काही शिल्लक ठेवत काही बियाणे शेतकऱ्यांना देता येईल. उत्पादनावर अनेक घटक परिणाम करणारे ठरतात. त्यामुळे प्रक्षेत्रावरील उत्पादकता व शेतकऱ्यांकडील उत्पादकतेत फरक राहू शकतो. - डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

टीम अॅग्रोवन

नागपूर ः जीएम तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेल्या वाणाची मागणी शेतकऱ्यांकडून होत असतानाच केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापसाचे सीएनए-१०२८ हे सरळ वाण विकसित केले आहे. प्रक्षेत्रावर या वाणाची हेक्‍टरी उत्पादकता तब्बल ४६ क्‍विंटल, तर शेतकऱ्यांना ४० क्‍विंटलची उत्पादकता मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. पूर्वप्रसारित या वाणाचे बियाणे लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.  केंद्रीय कापूस संस्थेद्वारा कोरडवाहू तसेच उत्पादनक्षम वाणाच्या संशोधनावर भर दिला जात आहे. त्यानुसार मध्य विभागातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तीन राज्यांकरिता सरळ वाण प्रसारीत करण्यात आले आहे. सीएनए-१०२८ असे या वाणाचे नाव असल्याची माहिती संस्थेच्या सूत्रांनी दिली. गुंटूर येथे झालेल्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कापूस) या विषयावरील कार्यशाळेत या वाणाच्या प्रसारणाला मान्यता देण्यात आली.  केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रावर या वाणाची उत्पादकता हेक्‍टरी ४६ क्‍विंटलपर्यंत मिळाली आहे. संस्थेने चाचणी म्हणून दिलेल्या एका शेतकऱ्याकडे हीच उत्पादकता हेक्‍टरी ४० क्‍विंटलपर्यंत पोचली. गरजेच्या वेळी पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत, भौगोलिक परिस्थिती, व्यवस्थापन अशा बाबी उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या ठरतात. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांकडे हीच उत्पादकता हेक्‍टरी दहा क्‍विंटलपर्यंत जाण्याची शक्‍यता राहील, असेही संस्थेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संस्थेने यापूर्वीसुद्धा सूरज हे वाण विकसित केले आहे.  अशी आहेत वैशिष्ट्ये   वाणाचे नाव :  सीएनए-१०२८   तंतूची लांबी (स्टेपल लेंथ) ः  २६ मिमी   तंतूची ताकद (स्ट्रेंथ) ः  २८ ते ३० जी/टेक्‍स   तलमता (मायक्रोनियर) ः ५.२    बंडल स्ट्रेंथ ः  ३०.९ जी/टेक्‍स   हेक्‍टरी उत्पादकता ः  ४० क्‍विंटल  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT