कापूस
कापूस  
मुख्य बातम्या

राज्यात ३६ केंद्रांवर कापूस खरेदीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

नागपूर ः राज्यात पणनच्या कापूस खरेदीचा मुहूर्तालाच बोजवारा उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या दिवशी एक क्‍विंटल कापसाची खरेदी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगीतले. त्यासोबतच ६० पैकी केवळ ३६ केंद्रेच बुधवारी (ता.२५) कशीबशी सुरू झाली. त्यावरूनच खरेदीत सुसूत्रता नसल्याचे सिद्ध झाले आहे.  सध्या कापसाची खरेदी खासगी व्यापारी ३४०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलने करीत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांना संरक्षण देण्याकरिता ‘सीसीआय’चा एजंट म्हणून पणन महासंघाने बुधवारपासून (ता.२५) खरेदी सुरू केली. या वेळी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस घेतला जाणार आहे. त्यामुळे खरेदीच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद खरेदीला मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात पहिल्याच दिवशी ६० खरेदी केंद्रे उघडण्यात येणार होती; परंतु नियोजनाअभावी पहिल्या दिवशी केवळ ३६ केंद्रेच सुुरू झाली आहेत. उर्वरित केंद्र आज (ता.२६) उघडण्यात येतील, असे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापूस खरेदीचा अशा प्रकारे पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला असून, त्यातच ऑनलाइनची सक्‍ती करण्यात आल्याने गोंधळात आणखीच भर पडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT