cotton procurement  
मुख्य बातम्या

कापूस हंगाम लांबणीवर?

पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी सुरु होईल.

टीम अॅग्रोवन

नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी सुरु होईल. तरीसुद्धा बाजारात कापूस आल्यास तो खरेदीची आमची तयारी असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल यांनी दिली. 

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने एफएक्यू दर्जाचा कापूस बाजारात दाखल झाल्यास त्याच्या खरेदीची तयारी दर्शवली आहे. त्याकरिता राज्य सरकारने नोंदणी व इतर प्रक्रिया पार पाडावी असा त्यांचा आग्रह आहे. राज्यात यावर्षी सीसीआयने पहिल्या टप्प्यात ६२ केंद्राकरिता निविदा काढली आहे. त्यानंतर कापसाची आवक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे. ज्या ६२ केंद्रांसाठी निविदा काढली आहे, त्याठिकाणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुद्धा काही बाजार समित्यांनी सुरू केली आहे. कापूस उत्पादकांची नोंदणी,  केंद्राच्या परिसरात कायदा- सुव्यवस्था व इतर सर्व प्रक्रिया या राज्य सरकार म्हणजे स्थानिक प्रशासनाला पार पाडाव्या लागतात. 

सीसीआयकडून केवळ कापूस खरेदी होते. त्यामुळे खरेदीपूर्वीची नोंदणी प्रक्रिया राज्य सरकारला पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर खरेदी सुरू होईल, असेच सांगण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर अखेर कापूस खरेदी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बाजारात कमी दर केंद्र सरकारने या वर्षी कापसाला ५८५० रुपये हमी भाव जाहीर केला आहे. याउलट खुल्या बाजारात मात्र कापसाची अवघ्या ४१०० रुपये दराने खरेदी होत आहे. कापसात ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने अशा कापसाला कमी दर मिळत असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. अमरावतीत एका व्यापाऱ्याकडून हमीभावापेक्षा पंधराशे रुपये कमी दराने कापसाची खरेदी झाली. कापसाची आवक बाजारात होत असल्याने शासकीय कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. प्रतिक्रिया बाजारात कापूस आल्यास आमची खरेदीची तयारी आहे. त्याकरिता नोंदणीची प्रक्रिया राज्य सरकारला पार पाडावी लागते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. एकंदर स्थिती पाहता ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी होईल.  — प्रदीपकुमार अग्रवाल,  अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय). --- नोंदणी करता विशेष ‘अॕप’ देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. हंगाम लांबल्याने ऑक्टोबर अखेरीस कापूस खरेदी होईल. त्यापूर्वी नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. - अनंतराव देशमुख, अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT