Cotton procurement is likely to continue till Diwali in Warud taluka
Cotton procurement is likely to continue till Diwali in Warud taluka 
मुख्य बातम्या

वरुड तालुक्‍यात दिवाळीपर्यंत कापूस खरेदी चालण्याची शक्यता 

टीम अॅग्रोवन

अमरावती ः वरुड येथील सीसीआयने सुरू केलेल्या एका कापूस केंद्रावर सुमारे ४ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आजवर केवळ २१४ शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी झाल्याने पुढच्या हंगामातील कापूस बाजारात येईपर्यंत कापूस खरेदी करणार काय? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपायाअंतर्गंत जाहीर संचारबंदीत कापूसही लॉकडाऊन झाला. परिणामी कापसाची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी वाढली. दबावामुळे २० एप्रिलनंतर शासनाने टप्याटप्याने खरेदी सुरू केली. वरुड परिसरात सीसीआयने एका केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी चालविली आहे. त्यातही नियम, अटींवर भर दिला जात असल्याने ही खरेदी दिवाळीपर्यंतही होण्याची शक्‍यता नाही. 

वरुड येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी ४४८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील आजवर फक्‍त २१४ शेतकऱ्यांकडील कापसाचे मोजमाप होऊ शकले. त्यावरून कापूस खरेदीच्या गतीचा अंदाज येत असल्याने या खरिपातील कापूस बाजारात येईपर्यंत गेल्या हंगामातील कापसाची खरेदी होत राहील, अशी भीती शेतकरी व्यक्‍त करीत आहेत. खरिपाकरिता शेतकऱ्यांना पैशाची गरज राहते. शेतमाल विक्रीतून ती भागविली जाते. त्यामुळे कापूस खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी होत आहे. 

खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा याकरिता शेतकरी कापूस विकत आहेत. परंतु एकच केंद्र असल्याने आणि खरेदीची गती पाहता येत्या दिवाळीपर्यंतही खरेदी शक्‍य नाही. त्यामुळे तालुक्‍यातील इतर जिनींगमध्ये खरेदी व्हावी, अशी मागणी आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे मागणी केली आहे.  - विक्रम ठाकरे, सभापती, पंचायत समिती, वरुड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT