कापूस बाजार उसळून ५५०० रुपयांवर
कापूस बाजार उसळून ५५०० रुपयांवर 
मुख्य बातम्या

कापूस बाजार उसळून ५५०० रुपयांवर

Chandrakant Jadhav

जळगाव ः दुष्काळ व प्रचंड उष्णता यामुळे अमेरिकेतील (यूएसए) टेक्‍सास प्रांतात कापूस लागवड जवळपास निम्मी घटली आहे. जगाला दरवर्षी २२० लाख गाठींचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेत तब्बल ६० ते ६२ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यातच पाकिस्तानध्ये लागवड केलेल्या बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणांबाबत मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने शंका उपस्थित केल्याने नवा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी जागतिक कापूस बाजारात मागील पाच दिवसांत मोठी उसळी आली असून, देशांतर्गत बाजारात कापूस दर मंगळवारी (ता. २९) प्रतिक्विंटल ५५०० रुपयांवर पोचला आहे. यंदा कापसाला मिळणारा हा उच्चांकी दर ठरला आहे.  देशात जसा महाराष्ट्र कापूस लागवडीत आघाडीवर आहे. तसा अमेरिकेत टेक्‍सास प्रांत कापूस लागवडीत पुढे असून, या भागात मार्च ते मे दरम्यान लागवड केली जाते. अमेरिकेत एकूण ३८ लाख ४८ हजार हेक्‍टवरवर लागवड केली जाते. त्यांची उत्पादकता हेक्‍टरी ९७२ किलो रुई प्रतिहेक्‍टरी एवढी आहे. दरवर्षी किमान २२० ते २२३ लाख गाठींचे उत्पादन अमेरिका करतो. परंतु तेथे दुष्काळी व उष्णतेची स्थिती आहे. उष्णतेमुळे कापूस लागवड घटली आहे.

अमेरिकेत ऑगस्ट ते डिसेंबर यादरम्यान रुई उपलब्ध होते. परंतु यंदा तेथे वेळेत व अपेक्षित प्रमाणात कापूस किंवा रुई मिळणार नाही. सुमारे ३३ टक्के उत्पादन तेथे घटेल. अर्थातच अमेरिका जागतिक बाजारात सुमारे ६० ते ६२ लाख गाठींचा पुरवठा कमी करील. जेवढे उत्पादन अमेरिका करतो, त्याची अधिकाधिक निर्यात तेथून केली जाते. तेथील उत्पादन घटेल, असे वृत्त जागतिक कापूस बाजारात आल्याने न्यूयॉर्क ट्रेड इंटेक्‍सने उसळी घेतली असून, सर्व देशांच्या कापसाचे दर वधारले आहेत.

भारतीय कापसाचे किंवा रुईचे दर सोमवारी ४२५०० रुपये प्रतिखंडी (३५६ किलो रुई) असे होते. ते मंगळवारी (ता. २९) ४४५०० रुपये झाले आहेत. न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्‍स प्रतिपाऊंड चार सेंटने वधारला आहे. देशांतर्गत बाजारात दर्जेदार कापसाचे दर प्रतिक्विंटल ५५०० रुपये किमान असे झाले आहे. अर्थातच केवळ एका दिवसात कापसाच्या दरात क्विंटलमागे सुमारे ३५० रुपये वाढ झाली आहे.  पाकिस्तानातही गोंधळ जगात पाकिस्तानमधील कापूस उत्पादनही जागतिक बाजारात रुईच्या पुरवठ्यासंबंधी महत्त्वाचे मानले जाते. तेथे दरवर्षी किमान ११८ लाख गाठींचे उत्पादन घेतले जाते. तेथे मार्च ते जुलै या दरम्यान कापूस लागवड केली जाते. कापूस लागवडीत तेथे सिंध, पंजाब हा भाग आघाडीवर आहे. या भागात लागवड बऱ्यापैकी झाली आहे. परंतु अलीकडेच मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन संस्थेने एका खासगी व आघाडीच्या कंपनीने जे बीटीचे तंत्रज्ञान पाकिस्तानला दिले, त्या तंत्रज्ञानावर शंका उपस्थित केली आहे. संबंधित तंत्रज्ञान बीटीचे नसल्याचे मुलतान येथील संशोधन संस्थेने किंवा केंद्राने म्हटले असून, या वृत्ताचाही कापूस बाजारावर परिणाम होऊन नवा गोंधळ निर्माण झाला आहे. तेथे हवे तसे उत्पादन येईल की नाही, असे प्रश्‍न तेथे उपस्थित होत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT