कापसाच्या वेचणीवरच पंचवीस टक्के खर्च
कापसाच्या वेचणीवरच पंचवीस टक्के खर्च 
मुख्य बातम्या

कापसाच्या वेचणीवरच पंचवीस टक्के खर्च

Suryakant Netke

नगर : गरजेच्या वेळी पाऊस झाला नाही अन्‌ वेचणीला सुरवात झाल्यावर शेवटच्या महिन्यात झालेल्या पावसाने हाती आलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले. अशा दुहेरी संकटात सध्या राज्यातील कापूस उत्पादक सापडला आहे. परतीचा पाऊस गायब झाल्यावर कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मात्र सध्या मजुराच्या टंचाईचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. वेचणीसाठी कापसाला प्रतिकिलोला तब्बल दहा ते बारा रुपये मजुरांना द्यावे लागत आहे. बाजारात कापसाला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दर मिळत असल्याने सध्याच्या दराचा विचार करता तब्बल पंचवीस टक्के रक्कम फक्त वेचणीवर खर्च करण्याची नामुष्की कापूस उत्पादकांवर आली आहे. विशेष म्हणजे कापूस वेचणीसाठी आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नागपूर भागात कापसाचे उत्पादन घेतले जायचे. अलीकडच्या दहा वर्षांत उसाचा पट्टा असलेल्या नगर, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर भागातही कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये तब्बल सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या सहा वर्षांत मात्र टंचाई आणि दुष्काळी स्थितीचा विचार करता कापसाचे क्षेत्र वाढत असले तरी उत्पादनात मात्र घट होत आहे.  दरम्यान उन्हाचा चटका वाढला असून कापसाची मोठ्या प्रमाणात फूट झाली. सध्या कापसाच्या वेचणीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी दहा ते बारा रुपये प्रतिकिलोला दर द्यावा लागत आहे. शिवाय मजुरांच्या जाण्या-येण्याचाही खर्च उत्पादकांना करावा लागत आहे. बाजारात मात्र चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांपेक्षा अधिक कापसाला दर नाही. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढले तरी दरामुळे कापसाची शेतीही आतबट्ट्याचीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात खासगी व्यापाऱ्यांकडून चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी सुरू झाली आहे. हमीभावाने खरेदी करण्यासाठी ''खरेदी केंद्र'' सुरू करणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र अजूनही कोठेच सरकारी खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT