संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगरमध्ये ७९३ गावांत कपाशीचे पंचनामे

टीम अॅग्रोवन

नगर  ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७९३ गावांत ४६ हजार ३४१ हेक्‍टर क्षेत्रावर पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. बोंड अळीमुळे नुकसान झाल्याने आणि आता शासनाने पंचनामे केल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये कापसाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात कापसाचे सरासरी साठ हजार हेक्‍टर क्षेत्र होते. मात्र, अलीकडच्या काळात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याने सरासरी एक लाख हेक्‍टर झाले आहे. यंदा जिल्हाभरात एक लाख पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले असले, तरी नंतरच्या काळात पावसाने दिलेला ताण आणि सरतेशेवटी झालेला जोराचा पाऊस यामुळे नुकसान झाले आणि त्यात पुन्हा बोंड अळीने हल्ला केल्यामुळे साधारण साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले.

त्यामुळे पीक घेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सुरू झाली. हिवाळी अधिवेशनातही कापसावरील बोंड अळीचा प्रश्‍न चर्चिला गेला. सदोष बियाण्यांचा विषय पुढे येऊन नुकसानभरपाई देण्याचे सरकारकडून आश्‍वासन मिळाले व सरकारनेही पंचनामे सुरू केले आहेत.

जिल्हाभरात आतापर्यंत ७९३ गावांत ६५ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाचे पंचनामे केले आहेत. अजूनही हे काम सुरू असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे केले जातील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.

पंचनामे झालेले तालुकानिहाय क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) नगर ः १३६९, पारनेर ः २३.६०, पाथर्डी ः १३२०६, संगमनेर ः २१०.६५, कोपरगाव ः २४८४, राहाता ः ५१५, श्रीरामपूर ः १६६५.९३, नेवासे ः ४६४२, राहुरी ः १८७३, शेवगाव ः १५२१२, कर्जत ः ७१५, श्रीगोंदे ः २००४, जामखेड ः २४१८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT