cotton procurement
cotton procurement  
मुख्य बातम्या

नांदेड: कापूस खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा

टीम अॅग्रोवन

नांदेड: खुल्या बाजारातील कापसाचे दर कमी असल्यामुळे यंदा राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळच्या (सीसीआय) केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या हमीभाव केंद्रांवर कापूस आवक वाढली आहे. खरेदी केलेला कापूस साठविण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून खरेदी बंद ठेवली जात आहे. परिणामी मोजमापास उशीर लागत असल्याने शेतकऱ्यांना वाहन भाडे भुर्दंड सोसावा लागत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत चालू खरेदी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २८) राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ (फेडरेशन), भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी व्यापारी यांची मिळून एकूण २२ लाख ६५ हजार २६३ क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्यात राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ४ लाख ४२ हजार ७०२ क्विंटल, ‘सीसीआय’च्या ४ लाख ९६ हजार २९१ क्विंटल, खासगी व्यापाऱ्यांच्या ८ लाख २  हजार ५४० क्विंटल कापसाचा समावेश आहे. पणन महासंघातर्फे नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि तामसा येथील केंद्रावर ५ हजार १५० शेतकऱ्यांचा १ लाख १४ हजार ४४८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. ‘सीसीआय’तर्फे नांदेड, किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर, बिलोली येथील केंद्रांवर १ लाख २९ हजार ८६० क्विंटल कापसाची खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्याकडून हदगाव हदगाव, किनवट, भोकर, धर्माबाद या ठिकाणी ३ लाख ५१ हजार १४३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. जिल्ह्यात पणन महासंघ, ‘सीसीआय’, खासगी मिळून एकूण ५ लाख ९५ हजार ४५१ क्विंटल कापसाची खरेदी झाली.  पणन महासंघाकडून परभणी जिल्ह्यात पाथरी, गंगाखेड, परभणी येथील १० केंद्रांवर १४ हजार ६४ शेतकऱ्यांच्या ४ लाख १२ हजार ८१९ क्विंटल कापसाची खरेदी झाली. ‘सीसीआय’तर्फे सेलू, मानवत, जिंतूर, पूर्णा, ताडकळस येथील ५ लाख ४१ हजार ३१५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, बोरी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत खासगी व्यापाऱ्यांनी ५ लाख ६ हजार ७७८ क्विंटल कापसाची खरेदी केली. जिल्ह्यात एकूण १४ लाख ६० हजार ९१२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. पणन महासंघातर्फे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे २ हजार १३७ शेतकऱ्यांचा ४५ हजार ७३९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.  ‘सीसीआय’कडून हिमायतनगर आणि जवळा बाजार येथील केंद्रांवर १ लाख ५१ हजार २४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. हिंगोली, आखाडा बाळापूर खाजगी व्यापाऱ्यांकडून ११ हजार ९१२ क्विंटल कापसाची खरेदी झाली. जिल्ह्यात एकूण २ लाख ८ हजार ८९८ क्विंटल कापसाची खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्याकडून प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६५० ते ५ हजार रुपये दराने कापूस खरेदी करण्यात आली. पणन महासंघाची कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)

जिल्हा  खरेदी केंद्र     खरेदी   शेतकरी
नांदेड   ११४४४८.७५ ५१५०
परभणी     १०   ४१२८१९.८१   १४०६४
हिंगोली    १   ४५७३९.९५ २१३७

सीसीआयची कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)

जिल्हा  केंद्र संख्या   कापूस खरेदी
नांदेड  ६   १२९८६०
परभणी  ७    ५४१३१५
हिंगोली  २     १५१२४७

खासगी कापूस खरेदी (क्विंटलमध्ये)

जिल्हा  जिनिंग     खरेदी
नांदेड   १४  ३५११४३
परभणी  ५० ५०६७७८
हिंगोली  २ ११९१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT