Cotton on 15,000 hectares in Bhusawal
Cotton on 15,000 hectares in Bhusawal 
मुख्य बातम्या

भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशी

टीम अॅग्रोवन

भुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे ज्वारी व मका या पिकांचे दाणादाण उडाली. त्यामुळे यावर्षी ज्वारी व मकाच्या पेऱ्यात घट झाली आहे. तर, खरेदी अभावी शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही कापूस पडून आहे. मात्र तरीही कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली असून १५,९५१ हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला.

गतवर्षी दिवाळीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे ज्वारी व मका या पिकांना जमिनीवरच कोंब आले होते. दोन्ही पिके मातीमोल झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे यंदा पाठ फिरवली. तर, कपाशीच्या बाबतीत निसर्गाकडून काहिसा दिलासा मिळाला होता. मात्र पेरणीपासून वेचणीपर्यंतचा खर्च विचार करता, शेतकऱ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे.

त्यात कोरोनामुळे कापसाची निर्यात बंद होती. तर, ‘सीसीआय’सह शासनाने इतर माध्यमातून खरेदी केंद्र सुरू ठेवली होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी लोभासाठी शेतकऱ्यांची नोंदणी फोनवर घेतली. मात्र व्यापाऱ्यांनाच दोन हजार रुपये प्रमाणे टोकनची सर्रास विक्री केली. त्यामुळे सीसीआय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांपेक्षा व्‍यापाऱ्यांच्या मालालाच संधी मिळाली. 

शेतकऱ्यांचा नंबर लागला, तरी क्विंटलला तीन ते चार किलो कपात, तिसरा चौथा ग्रेट लावून शेतकऱ्यांना अक्षरशः धुऊन काढण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अवघ्या साडेचार हजार रुपये क्विंटल प्रमाणे व्यापाऱ्यांना कापूस विकला. तर फर्दडचा भाव तीन हजार रुपये लावण्यात आला. शेतकऱ्यांची अक्षरशः लूट झाली.

त्यात अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे . मात्र तरीही शेतकऱ्यांचा कपाशीवर भरवसा असल्याने कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. यावर्षी ज्वारी व मका यांचे सरासरी पेरणी क्षेत्रात घट झाली. उडीद, मूग, या कडधान्यच्‍याही क्षेत्रात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT