bendur
bendur  
मुख्य बातम्या

कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावट

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७) साजरा होत आहे. मात्र, कोरोनाचे सावट यंदाच्या बेंदुरावर स्पष्ट दिसत आहे. कर्नाटक व कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक लगतच्या भागात हा बेंदूर साजरा केला जातो.  बैलापासून बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या उत्साहापासून कर तोडण्याच्या सामुहिक कार्यक्रमांवर कोरोनाने नांगर फिरविले आहे. लॉकडाउनमुळे सुताचा दोरा आदी कच्चा माल तयार न झाल्यामुळे बैलासाठी लागणारा दोरा व अन्य साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे बाजारपेठेत जे विक्रेते दरवर्षी बेंदुराला चार ते पाच लाखांची उलाढाल करतात त्याच विक्रेत्यांनी यंदा कमी भांडवल गुंतवून कसेबसे साहित्य विक्रीस ठेवले आहे. बेंदूर सण म्हणजे बैल सजावट, मिरवणूक आणि सायंकाळी कर तोडणीचा सामूहिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. मात्र यावर कोरोनामुळे मर्यादा आल्याने बळीराजाचा बेंदुरातील उत्साह गायब झाला आहे. बाजारपेठेतील खरेदीस शेतकऱ्यांची लगबग कमीच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील काही गावे व कर्नाटक सीमा भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. कोरोनाच्या स्थितीतही विक्रेत्यांनी बाजारपेठेत बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवले आहे. कासरा, गोंडे, माळा, कवड्यांच्या माळा, घुंगरू पट्टे, हनपट, कंडा असे विविध आकर्षक साहित्य विक्रीस आहे. यंदा साहित्याचे दरही जैसे थे आहेत.  प्रमुख पशुधन साहित्य विक्रेत्यांकडून हे साहित्य विक्रीसाठी आहे. तसेच प्रमुख मार्गावर कुंभार व्यावसायिक बैल जोड्यांचे स्टॉल लावत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT