नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बंडखोरांमुळे होणार अटीतटीच्या लढती
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बंडखोरांमुळे होणार अटीतटीच्या लढती 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बंडखोरांमुळे होणार अटीतटीच्या लढती

टीम अॅग्रोवन

नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ मतदारसंघात काही ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी, महायुती- आघाडीतील बंडखोरांमुळे अनेक मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उमेदवार असलेल्या भोकर मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बंडखोरी, गटबाजीमुळे महायुती, आघाडीमध्ये धुसपुस सुरू आहे. भाजपच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे.

मागच्या निवडणुकीत या जिल्ह्यांत १६ पैकी शिवसेनेला सहा, काँग्रेसला चार, राष्ट्रवादीला तीन, भाजपला दोन, अपक्षाला एक जागा मिळाली. नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार खासदार झाले. भोकर मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी खासदार अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत. विद्यमान आमदारांपैकी काँग्रेसच डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), वसंतराव चव्हाण (नायगाव), शिवसेनेचे सुभाष साबणे (देगलूर), नागेश पाटील आष्टीकर (हदगाव), भाजपचे तुषार राठोड (मुखेड), राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक (किनवट) हे सहाजण, तर माजी आमदारांपैकी भाजपकडून बापुसाहेब गोरठेकर (भोकर), भीमराव केराम (किनवट), काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर (देगलूर), माधवराव पाटील जवळगावकर (हदगाव) हे निवडणूक रिंगणात आहेत.

मागच्यावेळी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विजय भांबळे (जिंतूर), डॅा. मधुसुदन केंद्रे (गंगाखेड), शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील (परभणी), अपक्ष मोहन फड (पाथरी)विजयी झाले. ते यंदा उमेदवार आहेत. जागांच्या अदलाबदलीत शिवसेनेला गंगाखेडची, तर भाजपला पाथरी, जिंतूरच्या जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा कायम आहेत. गेल्या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात भाजपचे तान्हाजी मुटकुळे (हिंगोली), काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे (कळमनुरी), शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा (वसमत) विजयी झाले. हे तिघेही यंदा उमेदवार आहेत.

नांदेड दक्षिण मतदासंघातून भाजप शिवसेना, राष्ट्रवादीचे, याशिवाय हदगाव, जिंतूर, पाथरीत शिवसेनेचे, परभणीत काँग्रेसचे, तर वसमतमध्ये भाजपचे बंडखोर आहेत. गंगाखेड मतदारसंघात शिवसेना आणि रासपचे उमेदवारात आहेत. बसप, भाकप, शेतकरी कामगार पक्ष, एमआयएम, संभाजी ब्रिगेड आदी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तरी बहुतांश ठिकाणी महायुती- आघाडी-वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढती होतील. प्रभावी बंडखोर असलेल्या मतदासंघात बहुरंगी लढती होतील. भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, वसमत, जिंतूर आदि मतदासंघांतील लढती लक्षवेधी ठरतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT