Commercial farming of crops on the dam in Konkan
Commercial farming of crops on the dam in Konkan 
मुख्य बातम्या

कोकणात बांधावरच्या पिकांची होणार व्यावसायिक शेती 

अमित गद्रे

पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात आर्थिक आणि प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या फळ, फूल पिकांच्या व्यावसायिक लागवडीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. 

प्रकल्पाबाबत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिरफळ, वटसोल, वावडिंग, कडीकोकम आणि सुरंगी ही पिके शेती बांधावर, परस बागेत मोठ्या प्रमाणात आहेत. यांचे औषधी आणि प्रक्रियामूल्य लक्षात घेता या दुर्लक्षित पिकांमध्ये व्यावसायिक संधी आहे. हवामान बदलाच्या काळात आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे दुर्लक्षित पिकांची लागवड आणि मूल्यवर्धनाकडेही आम्ही संशोधन प्रकल्प हाती घेतला. दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित परंतु व्यावसायिक मूल्य असणाऱ्या विविध पिकांची कृषी विभाग, शेतकरी गट आणि लुपीन फाउंडेशनच्या मदतीने नोंदणी पूर्ण केली. 

निरुखे गाव शिवारात जांभळाच्या तीन वैशिष्टपूर्ण जाती मिळाल्या आहेत. त्यांची कलमे तयार केली असून, विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड झाली आहे. विद्यापीठाने दुर्लक्षित पिकांच्या संवर्धनासाठी समूह शेती प्रकल्प हाती घेतला आहे. यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे दुर्लक्षित झालेली पिके येत्या काळात आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरतील. रायगड जिल्ह्यात पपनस, नीरफणस आणि रामफळाच्या लागवडीला संधी आहे. या पिकांच्या नवीन जातींबाबतही संशोधन सुरू आहे. 

पिकांचे महत्त्व 

  • तिरफळाचे बी आणि कवच हे मसाला आणि औषधी गुणधर्माचे. 
  • वटसोलाच्या फोडी वाळवून आमसुलासारखा वापर. 
  • वावडिंग आणि कडीकोकम फळांचा औषधीनिर्मितीमध्ये वापर. 
  • सुरंगी फुलांना अत्तर निर्मितीसाठी मागणी. 
  • विद्यापीठाने सुरंगी, वटसोल, तिरफळाची जातिवंत अधिक उत्पादन देणारी झाडे निवडून कलमे तयार केली. ही कलमे संशोधन प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतावर लावण्यात आली आहेत. वावडिंगाच्या बी रुजविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या पिकांच्या वाढीचा अभ्यास सुरू आहे. - डॉ. पराग हळदणकर,  संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली 

    कोकणपट्टीत मामफळ, सुरंगी, नागकेशर, वटसोल ही दुर्लक्षित पिके आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. अभ्यासू शेतकऱ्यांनी ही झाडे बांधावर जपली आहेत. व्यावसायिक आणि आर्थिक मूल्य असणाऱ्या या पिकांबाबत कृषी विद्यापीठ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लागवडीचे प्रयोग केले तर संशोधन आणि विस्ताराला चालना मिळेल.  - मिलिंद पाटील, पिंगोळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    SCROLL FOR NEXT