Clear the paved road, otherwise facilitate the helicopter 
मुख्य बातम्या

पांदण रस्ता मोकळा करा, अन्यथा हेलिकॉप्टरची सुविधा द्या 

शेतापर्यंत जाणारी वाट एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून अडविली. परिणामी, हंगामात शेती काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा पांदण रस्ता मोकळा करून द्यावा. अन्यथा, शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टीम अॅग्रोवन

नागपूर : शेतापर्यंत जाणारी वाट एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून अडविली. परिणामी, हंगामात शेती काम करणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा पांदण रस्ता मोकळा करून द्यावा. अन्यथा, शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

काटोल उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले.  काटोल येथील शेतकरी सचिन बाबाराव शेंद्रे यांची पेठ बुधवार शिवारात शेती आहे. याच भागात अक्षय किशोर इफर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा आहेत. पूर्वी जाम नदीच्या पात्रातून या भागातील शेतकरी वहिवाट करत होते. परंतु आता या पात्राचे खोलीकरण झाल्यामुळे हा रस्ता वहिवाट करण्याजोगा राहिला नाही. २००० मध्ये शासनाच्या वतीने शेतातील जागा रस्त्याकरिता खरेदी करण्यात आली. 

या जमिनीचा आर्थिक मोबदलासुद्धा संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आला. या माध्यमातून शेतापर्यंत जाण्यास नवी वहिवाट उपलब्ध झाली. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतीपूरक व्यवसाय उभारले. त्याकरिता बँकेचे कर्जसुद्धा घेतले आहे. परंतु व्यवसाय जेमतेम सुरू झाला असतानाच किरण महाजन या शेतकऱ्याने अतिक्रमण करून त्यांचा रस्ता अडविला. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या वहिवाटीची ही अडचण लक्षात घेता पांदण रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पांदन रस्ता मोकळा करणे शक्य नसल्यास प्रशासनाने शेतापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची सर्वदूर चर्चा होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT